कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नांदेड, (प्रतिनिधी) – कोवीड-१९  कोरोना व्हायरस प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी एकजुटीने एकवटली आहे. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या व हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब मजूरदारांना अन्नदान तसेच उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य वाटपाला मोठी गती देण्यात आली आहे. यापुढे जाऊन नांदेड शहर स्तरावर आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अत्यावश्यक रुग्णांसाठी आजपासून विनामूल्य ‘ऍम्ब्युलन्स’ सेवा आरंभिली आहे.

नांदेड येथे आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद व वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या पुढाकाराने तसेच नांदेडच्या तहजीब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सौजन्याने वंचितच्‍या या मोफत ऍम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. पूज्य भदंत पैंया बोधी आणि मौलाना अजीम रजवी सहाब यांच्या हस्ते मोफत ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानंतर नांदेड येथे वंचित बहुजन जिल्हा आघाडीतर्फे मदत कक्ष उभारण्यात आला आहे. नांदेड शहर, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर लॉकडाऊन मध्ये सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.

नांदेड शहरात विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे भोजन डबा पोहोचविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा मोफत भोजनाची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. लॉकडाऊन आदेशाला उणेपुरे दोन आठवड्यांचा कालावधी होत असल्याने नांदेड शहरात हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करणारे गोरगरीब, कामगार- कष्टकऱ्यांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. बहुतेक झोपडपट्टी परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या गोरगरीबांच्या चुली बंद पडत आल्या आहेत. अशा गरजू लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्नधान्य पाकिटे घरपोच पुरवण्यात येत आहेत. ज्यामध्ये गहू-तांदूळ, डाळ, साखर , तेल आदी अत्यावशक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय नांदेड शहरात विविध रस्त्यांवर वावरणाऱ्या बेवारस व भिक्षेकरी यांच्यासाठीसुद्धा खिचडी तसेच पाणी वाटपावर वंचित आघाडी तर्फे भर देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद, जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आयुब खान, उपाध्यक्ष अशोक कापशीकर, कनिष्क सोनसळे, संम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संदीप वन्ने, उन्मेश ढवळे, सचिन नवघडे, सोपान वाघमारे, गणेश सूर्यवंशी आदी यासाठी परिश्रम घेत आहे.


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण 

  • April 21, 2020 at 6:52 pm
    Permalink

    जय भिम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *