Connect with us

News

भटक्या विमुक्त जमातींचा राजकीय स्वतंत्र मार्ग ९ जूनला स्पष्ट होणार

Published

on

भटक्या विमुक्त जमातीचे पुण्यात 9 जूनला राष्ट्रीय अधिवेशन, अॅड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

जितरत्न पटाईत –

पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर.

पुणे –  आजतागायत इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी भटक्या विमुक्त जमाती, वंजारी, धनगर, पूर्वाश्रमीचे अस्पृश्य जाती आदींचा फक्त वापर करुन घेतला आहे. इथल्या धर्मनिरपेक्षवादी संघटना, पक्षांनी “आमचा फक्त वापर केलाय” अशी भावना इथल्या वर्गामध्ये वाढत चालली आहे. त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यात आल्या नाहीत. या समाजातील तरुणांमध्ये आम्ही “सोशल फोर्स” म्हणून उभे राहू, स्वताची ताकद निर्माण करु व इथल्या सत्तेमध्ये सहभागी होऊ अशी भावना निर्माण झालीय. या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे व त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने, विवेक मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, आमच्या न्याय हक्काचा लढा आम्हालाच लढावा लागेल. पुण्यात 9 जून रोजी होणारी परिषद त्याची नांदी आहे. 20 मे रोजी धनगर समाजाचा पंढरपूर येथे होणारा “सत्ता संपादन निर्धार मेळावा” हा देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल. 9 जून रोजी होणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या परिषदेस आमचा पाठींबा आहे. या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहवे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यावेळी लक्ष्मण माने म्हणाले की, इथुन पुढे आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांच्या दारात भीक मागण्यासाठी जाणार नाहीत. सन्मानाने जे आम्हाला वागवतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. मदतीसाठी अाम्ही झोळी घेऊन हिंडणार नाही. अशी भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहोत.  आम्ही सर्व एकत्र आल्यावर निश्चितच आमचे प्रश्न आम्ही सोडवू, असे प्रतिपादन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी केले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाने उपस्थित रहावे असे आवाहन ही त्यांनी केले.

महाराष्ट्राची वाटचाल अकोला पॅटर्नच्या दिशेने –

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेला अकोला पॅटर्नच्या दिशेने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल होतांना दिसत आहे. सत्तेमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व देण्याचा अकोला पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला आहे. यामध्ये अल्पसंख्यांक, आदिवासी, भटके विमुक्त, अलुतेदार-बलुतेदार, महिला आदिंना सत्तेमध्ये सहभाग मिळाला आहे. राज्यातील अनेक वंचित समूह अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आपल्या न्यायासाठी लढा देताय. त्यामुळे “महाराष्ट्राची वाटचाल अकोला पॅटर्नच्या दिशेने” होत आहे असं चित्र निर्माण होतांना दिसत आहे.

 

News

नॉन बँकिंग क्षेत्र प्रचंड अडचणीत – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Published

on

मुंबई – नॉन बँकिंग क्षेत्र प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये आलेले आहे. 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरपर्यंत या नॉन बँकिंग सेक्टरला 1 लाख कोटी त्यांनी जे बॉरो केलेले आहे ते परत द्यायचे आहे. हे नॉन बँकिंग सेक्टर मुख्यता मनी बॉरो करते. कमर्शियल पेपरच्या माध्यमातून हे कमर्शियल पेपची वैधता बहुतांश 90 दिवसांची असते, हे बॉरॉइंग दोन ठिकाणाहून होते. ( बँक व म्युच्युअल फंड) नॉन बँकिंगने रेझ केलेला फंड मुख्यता हाऊसिंग फायनांसिंग कॉर्पोरेशनला दिला जातो आणि नंतर ते बिल्डरला दिले जाते. हाऊसिंग इंडस्ट्रीत काम करणार्‍यांना ते दिले जाते. या बँकिंगवरती रिजर्व बँकेचे तसे नियंत्रण नाही. यावर नॅशनल हाऊसिंग अ‍ॅथोरीटीचे नियंत्रण असते. असे प्रतिपादन भारिप नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थितीवर भाष्य करण्यासाठी या पत्रकार परिषदेची आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आजच्या स्थितीमध्ये या हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये 56 लाख कामगार आहेत, त्याच्यापैकी निम्मे कामगार घरी बसलेले आहेत. नोटबंदीचा परिणाम आता दिसायला लागलेला आहे. ऑक्टोबर ते मार्च 2015ला 1 लाख 40 हजार घरे विकले गेली होती. मार्च 2018 मध्ये तिच संख्या 1 लाख 20 हजारावर आली. 14% चा फॉल झालेला आहे. नवीन प्रोजेक्ट 2014 पूर्वी 1 लाख 30 हजार होते ते आता 2018ला 90 हजारावर आले आहेत. यावरून ही बांधकाम व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आलेली दिसते. लाँच किंवा सुरुवात झालेले प्रोजेक्टची स्थिती, तर त्यापेक्षाही भयानक आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये मागच्या चार वर्षांमध्ये अर्धवट बांधकाम 30.2 मिलियन स्क्वे. फीट. इतके आहे. दिल्लीमध्ये 22.8 मिलीयन स्क्वे फीट आहे, बँगलोरमध्ये 21.6 मिलियन स्क्वे. फीट 50 मोठे डेव्हलपर्सकडे अनसोल्ड (न विकलेला एरीया) 639 मिलीयन स्क्वे फीट इतका आहे. याच्यामुळे पैसा रोलींग झाला नाही व त्यामुळे या नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन्स अडचणीत आलेल्या आहेत आणि या अडचणीत आलेल्या बँकांना बेलआऊट करावे म्हणून शासनाचा निर्णय होतोय.

    रिझर्व बँक म्हणत आहे की, ‘‘ही आमची जबाबदारी नाही याच्याकडे शासनाने बघावे’’. या दोघांमधील कळीचा मुद्दा आपल्याला दिसतोय. या संदर्भात बैठक झाली पण निर्णय होऊ शकला नाही व बँका यांना लोन करतील अशी बातमी वर्तमानपत्रात आली आहे. बँकांची आजची स्थिती पाहिली तर, बँकेकडे लिक्वीडीटी फक्त 17 % आहे, म्हणून स्टेट बँकेनेसुद्धा एटीएममधून पैसे काढायची मर्यादा 40 हजारावरून 20 हजार केले आहे. दुसरा असाही रिपोर्ट आला आहे की, जेवढे पैसे बँक मार्केटमध्येे टाकत आहेत त्याच्यापैकी फक्त 60% बँकेमध्ये परत येत आहेत व 40% पुन्हा लोक स्वतःकडे घेऊन ठेवत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या शासनावरचा लोकांचा विश्‍वास संपलेला आहे. लोकांना असे वाटते आहे की, बँका कधी ना कधीतरी बुडतील, आपले पैसे बुडतील आणि म्हणून ते पैसे आता स्वत:कडे ठेवत आहेत. शासन म्हणत आहे की, आम्ही 40 हजार कोटी त्यांना देऊ व बेलआऊट करू, पण 30 नोव्हेंबरपर्यंत 1 लाख कोटी त्यांना मार्केटमध्ये परत करायचे आहेत आणि अशावेळेस व्यापार्‍यांकडून आणि इतरांकडून जे मांडले जात आहे की, शासनाने या ‘एनपीएफसी फेल्युअर’ होऊ नये. या सर्व परिस्थितीत व्यापारी म्हणत आहेत की, हाय एंडेड बॉन्ड म्हणजे 18% चे बॉन्ड काढा, ते टॅक्स फ्री करा आम्ही तो विकत घेतो व जो काही नॉन बँकिंग क्षेत्राला जो फायनान्स पाहिजे तो पुरवता येईल. स्थिती आज अशी आहे की, सरकार बँक करप्ट झालेले आहे व लोकांकडे पैसा आहे आणि व्यापारी वर्गाकडे जो पैसा आहे तो मुळचा बँकेचा एनपी अकाऊंट आहे. 10.3 लाख कोटींचा आहे त्याच्यातला हा फंड आहे. येथे फ्रॉड करायचा, सरकारचे बॉन्ड विकत घ्यायचे आणि तोच नंतर सरकारला प्लेज करायचा अशी जी सिस्टम चाललेली आहे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हे सरकार गरिबाचे सरकार नाही, हे श्रीमंतांचे सरकार आहे, बँकेमध्ये मध्यमवर्गीयांचा सर्व पैसा आहे. पेन्शनर्सचा पैसा आहे, शेतकर्‍याचा पैसा आहे आणि हा सगळा पैसा त्यांच्या सेव्हींग अकाउंंटमध्ये आहे. बिजनेसमन व ट्रेडर जो आहे त्यांचा पैसा करंट अकाऊंटमध्ये आहे. करंट अकाऊंट मधला सर्व पैसा 100% काढता येतो. सेव्हींग अकाऊंट मधला पैसा मात्र, बँक जेवढे सांगेल तेवढाच काढता येतो. अशी सक्ती बँकेनेच लावलेली आहे. म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की, तुम्हाला हे हाय एन्डेड बॉन्ड काढायचेच असतील, तर ते पहिल्यांदा रिटायर्ड होणार्‍या पेन्शनरला द्या, पण ते देत असताना ते दरमहा इंटरेस्ट पेमेंटचे असले पाहिजेत. दुसरे जे रिटायर झालेले आहेत व त्यांचा बँकेत पैसा आहे त्यांची लिक्वीडीटी वाढते, तिसरे ते शेतकर्‍यांना द्या, चौथे म्हणने आहे की, सर्वसामान्य माणसाला हे बॉन्ड विका. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बॉन्ड मोठ्या व्यापार्‍याला विकण्याला आमचा विरोध असणार आहे.

     शासनाने ही भूमिका घेतली की, मोठ्या व्यापार्‍यांना विकायचे आणि हाय व्हैल्यु बॉन्ड काढायचा असे म्हटले, तर आमचा त्याला विरोध असेल. इथे बँकिंग सिस्टम आहे, पोस्टल सिस्टम आहे, स्मॉल सेव्हींग सिस्टम आहे, जे जे खातेदार आहेत, त्या सगळ्या खातेदारांना, जर ऑफर दिली, तर हाय एन्डेड बॉन्ड घेऊन नॉन बँकिंग क्षेत्रावर जे काही आज संकट आपल्याला दिसते ते संकट टाळता येऊ शकते. हे नुसते हाऊसिंग क्षेत्रातील अवस्था मी आपल्यासमोर मांडले आहे, इनफ्रास्ट्रक्चरचीही अशीच परिस्थिती आहे आणि म्हणून लोकांनी सावध राहिले पाहिजे की, या शासनावरती लोकांचा विश्‍वास नाही. तेव्हा ते विश्‍वास निर्माण करणारे शासन निर्माण झाले, तर त्यात अधिक चांगले होईल. नाहीतर आम्हाला दिसते आहे की, एकतर आर्थिक आणीबाणी येईल. ती आणता आले नाही, तेवढी हिम्मत दाखवता आली नाही, तर पाकिस्तानसोबत युध्द होईल, तेही करता आले नाही, तर मला तिसरे असे दिसते की मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल. पाकिस्तान बरोबरच ते होईल आणि या परिस्थितीतून थोड्याफार प्रमाणात विचलित करण्याचा प्रयत्न केला जाईल. आज शासनाचे आणि आरबीआयचे जे काही भांडण सुरू आहे. त्याच्यामधला हा नॉन बँकिंग सेक्टर एक मोठा सेक्टर आहे. सरकार हे रिझर्व बँकेची स्वायत्ता काढून घेण्याच्या विचारात आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. शासनाने जे एनपीए अकाऊंट आहेत त्या अकाऊंटबरोबर जर वसुलीला सुरुवात केली, तर आर्थिक स्थिती ही बदलू शकते. शासन नेहमी म्हणत असते एफडीआय येण्याची एवढी शक्यता आहे. आपल्याकडे एफडीआय येण्याची अजिबात शक्यता नाही हे आपण लक्षात ठेवावे. याचे कारण 7.5 % आपण जास्तीत जास्त इंटरेस्ट देतो. या 7.5 % इंटरेस्टला 10% टॅक्स जर लावला, तर इंटरेस्ट 5 किंवा 5.2 याच्या मध्येच खेळत राहील. आज बाहेरच्या देशांमध्ये 6 % इंटरेस्ट आहे, त्यामुळे 0.75% नी आपल्याकडचा इंटरेस्ट कमी आहे. त्याच्यामुळे एफडीआय यायची अजिबात शक्यता नाही. आता चांगल्या आर्थिक मॅनेजरची गरज आहे. मोदी आणि सध्याचे दोघेही वर्स्ट फायनांशियल मैनेजर आहेत. या देशाची स्थिती अशा पद्धतीने आणली त्याला कारण, तेलामधील 2014 पासून 2016 पर्यंत 2 लाख 10 हजार कोटींची बचत झाली होती ते यांनी उडवल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे असा माझा या सरकारवर आरोप आहे. त्याच्यामुळे सामान्य माणसाने सावधरीतीने बँकिंग व्यवहार करावा हा माझा त्यांना सल्ला आहे.

Continue Reading

News

Amravati fire: Bharip team cancel all programs to raise aid for the victims.

Published

on

[:en]

Amravati Unit of Bharip Bahujan Mahasangh provides help, aid, and assistance to families who lost their homes in the fire.

 

The Anjangaon unit of the Bharip Bahujan Mahasangh cancelled all the programmes set up for the birthday celebrations of the party chief, Adv. Prakash Ambedkar to set up relief funds for families who lost their homes in the fire at Amravati. Necessary commodities were also handed, in an attempt to help the families stabilize and get them back on their feet.

Bhaurao Tayade, Madhukar Nandvandar, Vijay Nandanwar, Bapu Nandvandar and Sunil Sardar were amongst those whose houses were burnt in the fire in Anjanagaon taluka. Considering the needs of the victims, the members of the victim’s family were helped with clothes, sarees, blankets, home appliances, utensils and other essential items, after canceling the ceremony at Anjangaon Surji, while the party unit was geared up for the celebrations.

Ramji Rathod, Rupesh Pundalikrao Vath, Vipin Anokar, Ankush Warp, Vinod Abhyankar, Gangatai Ingale, Ravi Athavale, former Sarpanch Vijaybhau Taide, Balasaheb Mohad, Pradip Chakanarayan, Premanand Ingle, Rashid Khan, Jamir Khan Saheb, Abdul Rehman, Sudhir Tayade, Buddhadev Jamiik, Arun Sardar, Shoheb Khan, Sheikh Sajid were the responsible and enthusiastic members of Bharip Bahujan Mahasangh who were extremely helpful and supportive towards all the victims of the fire.[:]

Continue Reading

News

अग्निकांडात भस्म झालेल्या कुटुंबीयांना जीवनावश्यक मदतीचे वाटप

Published

on

 

अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून केली मदत, अजंनगाव भारिप बहुजन महासंघाचा स्तुत्य उपक्रम.

 

                                                                                  पीडितांना मदत करतांना

 टीम प्रबुध्द भारत –

अमरावती – भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करुन अग्नीकांडात भस्म झालेल्या कुटुबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन भारिप बहुजन महासंघाच्या अंजनगांव टीमने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करुन सामाजिक पायंडा घालून दिला आहे.

अंजनगांव तालुक्यातील कापूसतळणी येथील भाऊराव तायडे, मधूकर नंदनवार, विजय नंदनवार, बापू नंदनवार, सुनील सरदार यांची घरे आगीत जळाली होती. स्वाभिमान सप्ताह अंतर्गत अंजनगाव सुर्जी येथे होणारा सोहळा रद्द करून, आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन पीडित कुटुंबातील सदस्यांना कपडे, साडी, ब्लँकेट, घरघुती वापराची भांडी, जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली. यावेळी लोकांना मदत करुन त्यांचे सांत्वन करण्यात आले.

यावेळी रामजी राठोड, रुपेश पुंडलिकराव वाठ, विपिन अनोकार, अंकुश वारंपाजर, विनोद अभ्यंकर, गंगाताई इंगळे, रवी आठवले, माजी सरपंच विजयभाऊ तायडे, बाळासाहेब मोहड, प्रदिप चक्रनारायण, प्रेमानंद इंगळे, कापुसतळणी भारिपच्या ग्रा.पं. सदस्य खैरुन्नीसाजी, रशिद खान, जमिर खाॅं साहेब, अब्दुल रहेमान, सुधिर तायडे, बुध्दभुषण जामाणिक, अरुण सरदार, शोहेब खाॅं, शेख साजिद तसेच गावातील मंडळीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

[:mr]

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून केली मदत, अजंनगाव भारिपने दिला मदतीचा हात

टीम प्रबुध्द भारत –

मदत करतांना अंजनगाव येथील भारीप बहुजन महासंघाची टीम

    अमरावती – भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करुन अग्नीकांडात भस्म झालेल्या कुटुबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन भारिप बहुजन महासंघाच्या अंजनगांव टीमने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करुन सामाजिक पायंडा घालून दिला आहे.

        अंजनगांव तालुक्यातील कापूसतळणी येथील भाऊराव तायडे, मधूकर नंदनवार, विजय नंदनवार, बापू नंदनवार, सुनील सरदार यांची घरे आगीत जळाली होती. स्वाभिमान सप्ताह अंतर्गत अंजनगाव सुर्जी येथे होणारा सोहळा रद्द करून, आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन पीडित कुटुंबातील सदस्यांना कपडे, साडी, ब्लँकेट, घरघुती वापराची भांडी, जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली. यावेळी लोकांना मदत करुन त्यांचे सांत्वन करण्यात आले.

        यावेळी रामजी राठोड, रुपेश पुंडलिकराव वाठ, विपिन अनोकार, अंकुश वारंपाजर, विनोद अभ्यंकर, गंगाताई इंगळे, रवी आठवले, माजी सरपंच विजयभाऊ तायडे, बाळासाहेब मोहड, प्रदिप चक्रनारायण, प्रेमानंद इंगळे, कापुसतळणी भारिपच्या ग्रा.पं. सदस्य खैरुन्नीसाजी, रशिद खान, जमिर खाॅं साहेब, अब्दुल रहेमान, सुधिर तायडे, बुध्दभुषण जामाणिक, अरुण सरदार, शोहेब खाॅं, शेख साजिद तसेच गावातील मंडळीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Continue Reading

Trending

Copyright © 2017 Zox News Theme. Theme by MVP Themes, powered by WordPress.