अग्निकांडात भस्म झालेल्या कुटुंबीयांना जीवनावश्यक मदतीचे वाटप

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून केली मदत, अजंनगाव भारिपने दिला मदतीचा हात

टीम प्रबुध्द भारत –

मदत करतांना अंजनगाव येथील भारीप बहुजन महासंघाची टीम

    अमरावती – भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करुन अग्नीकांडात भस्म झालेल्या कुटुबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन भारिप बहुजन महासंघाच्या अंजनगांव टीमने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करुन सामाजिक पायंडा घालून दिला आहे.

        अंजनगांव तालुक्यातील कापूसतळणी येथील भाऊराव तायडे, मधूकर नंदनवार, विजय नंदनवार, बापू नंदनवार, सुनील सरदार यांची घरे आगीत जळाली होती. स्वाभिमान सप्ताह अंतर्गत अंजनगाव सुर्जी येथे होणारा सोहळा रद्द करून, आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन पीडित कुटुंबातील सदस्यांना कपडे, साडी, ब्लँकेट, घरघुती वापराची भांडी, जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली. यावेळी लोकांना मदत करुन त्यांचे सांत्वन करण्यात आले.

        यावेळी रामजी राठोड, रुपेश पुंडलिकराव वाठ, विपिन अनोकार, अंकुश वारंपाजर, विनोद अभ्यंकर, गंगाताई इंगळे, रवी आठवले, माजी सरपंच विजयभाऊ तायडे, बाळासाहेब मोहड, प्रदिप चक्रनारायण, प्रेमानंद इंगळे, कापुसतळणी भारिपच्या ग्रा.पं. सदस्य खैरुन्नीसाजी, रशिद खान, जमिर खाॅं साहेब, अब्दुल रहेमान, सुधिर तायडे, बुध्दभुषण जामाणिक, अरुण सरदार, शोहेब खाॅं, शेख साजिद तसेच गावातील मंडळीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

By | 2018-05-11T11:37:51+00:00 मे 11th, 2018|News|0 Comments